रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाच्या) संगमनेर तालुकाध्यक्षपदी साहेबराव यादव तर जिल्हासचिव पदी दादासाहेब यादव यांची निवड…
संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):-अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाची नुकतीच जिल्हा कार्यकारणीची बैठक जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी येथे संपन्न झाली.यावेळी संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते दादासाहेब यादव यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली तर आंबेडकरी चळवळतील ज्येष्ठ कार्यकर्ते साहेबराव यादव यांची संगमनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांच्यासह जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीसाठी उपस्थित होते.
दादासाहेब यादव साहेबराव यादव यांच्या निवडीचे अभिनंदन लोकनेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात,माजी आमदार.डॉ.सुधीर तांबे,तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात,पॅंथर माणिकराव यादव,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव,आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
