Crime..मध्यरात्री कोयत्याच्या धाक दाखवत जबरी चोरी..LCB चा चोरांना दणका..! दोन महिलांसह २ गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर तालुक्यातील बारदरी रोडवरील गर्भगिरी फाटा येथे मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) ने पर्दाफाश केला आहे.या कारवाईत तीन मुख्य आरोपींसह दोन महिला व एक सोनार असा एकूण ६ आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून २,८८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फिर्यादी सुलभ अंबादास नरसाळे (वय २९,रा. नालेगाव,कल्याण रोड, अहिल्यानगर) हे दि.२४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास बारदरी रोडवरील गर्भगिरी फाटा येथे लघवीसाठी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली असता, मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्याला लोखंडी कोयता लावून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून पळ काढला.या घटने प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांना दिले होते.तपासा दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि.३० जानेवारी २०२६ रोजी तपोवन रोड येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली –शुभम शहादेव बडे (वय २६, रा. सावेडी),सोहेल पापाभाई सय्यद (वय २९,रा.देवटाकळी,शेवगाव),अशपाक नासिर पठाण (वय २८, रा.भिंगार) सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत चोरीतील सोन्याचे दागिने त्यांच्या मैत्रिणी वैष्णवी उनवने व रुपाली बनकर यांच्या मार्फत विक्री केल्याचे उघड केले.त्यानंतर भगवानबाबा चौक येथून – 4) वैष्णवी राजेंद्र उनवने (वय २४),5) रुपाली गजानन बनकर (वय २४) यांना ताब्यात घेण्यात आले.
या दोघी महिलांनी चोरीतील सोन्याचे दागिने सोनार सुरज प्रदीप शहाणे (वय ३४, रा. केडगाव) याला विकल्याची माहिती दिली.तपासात सोनाराने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.पोलिसांनी आरोपींकडून –११ ग्रॅम सोन्याची गोळी (₹1,48,000),४ मोबाईल फोन (₹60,000),एक मोटारसायकल (₹80,000),लोखंडी कोयता (₹100),असा एकूण ₹2,88,100/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.मुख्य आरोपी शुभम बडे व अशपाक पठाण यांच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, बलात्कार,मकोका व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.ताब्यातील सर्व आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार दिपक घाटकर,भिमराज खर्से,राहुल डोके,प्रशांत राठोड,अमृत आढाव,योगेश कर्डीले,सोनल भागवत,चालक उत्तरेश्वर मोराळे यांनी केली आहे.
