श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.२१ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बसस्थानक आगारात श्रीरामपूर-अहमदनगर या बसमध्ये तरुणीचा विनयभंग करणार्या फरार झालेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.घटनेतील अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर-अहमदनगर या बसमध्ये फिर्यादी तरुणी देवळाली गावी जाण्यासाठी ड्रायव्हर शीटच्या मागील सिटवर बसली होती.तिच्या मागच्या सीटवर खिडकीजवळ बसलेल्या संदीप सर्जेराव माळी (रा.देवळाली ता. राहुरी) याने पाठीमागून शीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून हात घालून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलस स्टेशनमध्ये संदीप सर्जेराव माळी याचे विरुध्द भादंवि कलम 354,354 (अ),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता.सदर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला व त्याच्या मुसक्या आवळल्या.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे करीत आहेत
