Maharashtra247

२६ फेब्रुवारी रोजी पेमराज सारडा महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२१ फेब्रुवारी):-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्‌योजता मार्गदर्शन केंद्र आणि पेमराज सारडा महाविदयालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 09.30 वाजता पेमराज सारडा महाविद्यालय, पत्रकार चौक,अहमदनगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नि.ना.सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.या रोजगार मेळाव्यासाठी अहमदनगर जिल्हयातील ४० ते ४५ नामांकित कंपन्या उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार असून इच्छुक एसएससी,एचएचसी, पदवीधर (बीए/बी कॉम/बी एससी),आयटीआय (सर्व ट्रेड) व वैदयकिय (नर्सिंग) इलेक्ट्रीकल,इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल,कंप्यूटर इ. क्षेत्रामध्ये डिप्लोमा,डिग्री झालेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उ‌द्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/8461qNvcHKy1H6BKA या लिंकवर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय करावे.सर्व इच्छूक उमेदवारांनी 26 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 09.30 वाजता पेमराज सारडा महाविद्यालय, पत्रकार चौक,अहमदनगर येथे रोजगार मेळाव्यास उपस्थित रहावे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा रोजगार मेळावा समन्वयक दिग्वीजय जामदार मो.नं. 7769844644 व संतोष वाघ मो.नं.8830213976 यांच्याशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page