उभ्या कंटेनरमधील तीन लाख रुपयांचे टायर चोरले एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी(दि.२१ फेब्रुवारी):-नगर-मनमाड रोडवरील नांदगाव (ता.नगर) शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील तीन लाख 45 हजार 200 रूपये किमतीचे टायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे घडली आहे.याप्रकरणी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर दत्तात्रय घोरपडे (वय 48 रा.विजयनगर ता.सिन्नर, जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी त्यांच्याकडील कंटेनरमध्ये (एमएच 43 बीजे 2218) ओपोलो कंपनीचे 11/20 मॉडेलचे 18 टायर व 09/20 मॉडेलचे दोन टायर असे एकुण तीन लाख 45 हजार 200 रूपये किमतीचे 20 टायर घेऊन नगर-मनमाड रोडने चालले होते. सदरचे कंटेनर सोमवारी पहाटे नांदगाव शिवारात थांबलेले होते.त्याच दरम्यान चोरट्यांनी कंटेनरच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील सर्व 20 टायर चोरून नेले.हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्ष्यात घेताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क केला.पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक गांगुर्डे करीत आहेत.