Maharashtra247

पवनार शिवसेना शाखेच्या वतीने शिवजयंती महोत्सव थाटात संपन्न

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी(गणेश हिवरे):-जिल्ह्यात ठीक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असली तरी पवनार शिवसेना शाखा शिंदेगट यांच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला या वेळी शिव छत्रपती राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारापन करण्यात आले.या वेळी ढोल ताश्याच्या गजरात शिवाजी महाराज की जय,जय भवानी, जय शिवाजी आवाजाने पवनार नगरी दुमदुमून उठली.या वेळी भगव्या पताकाने गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते,या वेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख श्री.गणेश इखार,उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे,माजी उपजिल्हाप्रमुख दीपक राऊत,प्रभाकर पेटकर,करन पेटकर,प्रशांत इंगळे,ईश्वर डोळसकर,प्रजवल हिवरे,ठोंबरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You cannot copy content of this page