शिवजयंती निमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्हा प्रतिनिधी (गणेश हिवरे):-शिवसेना शिंदे गटा तर्फे शिवजयंती निमित्त आपला दवाखांन्याचे आयोजन करण्यात आले. यात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री.किशोरभाऊ बोकडे यांच्या नेतृत्वात सौ.वंदना किशोर बोकडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी शिवाजी महाराजांना अभिवादन करून माल्यारापन करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी फाऊंडेशन तर्फे गोर-गरीब जनतेला मोफत उपचार मिळावा या उद्देशाने ठाणे या ठीकाणा वरून झाली.यात गोर गरीब नागरिकांना मोफत उपचार केला जात आहे.त्या मुळे जिल्ह्यातील नालवाडी इथेही शिवजयंती निमित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे आयोजन करण्यात आले यात 100 हून अधिक स्थानिक नागरिकांनी आयोजनाचा लाभ घेतला असून मोफत आरोग्य तपासणी करून औषधीचे वाटप करण्यात आले या करिता डॉ.अभय मोहिते,डॉ.शुभम तलवेकर यांनी मोफत स्वरूपात सेवा देत मोठे योगदान दिले.