वर्धा जिल्हा प्रतिनिधी(गणेश हिवरे):-नजीकच्या पवनार इथे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दीपक रामदासजी राऊत यांच्या निवासस्थानी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी वर्धा जील्हाचे आमदार श्री.पंकज भोयर यांनी दीपक राऊत यांच्या निवासस्थानी भेट देत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तर भाजपाचे जिल्हाअध्यक्ष श्री.सुनील भाऊ गफाट यांच्या कडून शिवरायांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली या वेळी स्थानिक गावातील पवनार ग्राम पंचायत सदस्य मोरेश्वर हुलके, रामूजी मगर,माजी सरपंच अजय गांडोळे,नारायणराव गोमासे,अविनाश पाटोळे, नितीन कवाडे,व इतर असंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित असून अल्पोहार वितरीत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
