अहमदनगर प्रतिनिधी (दि.22 फेब्रुवारी):-भोयरे पठार येथुन घरफोडी करून चोरीस गेलेले सुमारे दिड लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण फिर्यादीस केले परत नगर तालुका पोलिसांची कामगिरी,याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी अविनाश बाबासाहेब साठे (रा.भोयरे पठार ता.नगर) हे त्यांच्या कुटुंबीयांसह समारंभास गेले असताना घरास कुलूप लावून गेले होते,चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले होते,सदरबाबत नगर तालुका पोलिस ठाणे गुरन 75/2021भादवीक 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचे कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला होता.सदरचे दिड लाख रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दि. 22/02/23 रोजी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादी अविनाश बाबासाहेब साठे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले,अविनाश साठे यांनी नगर तालुका पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका सपोनि/राजेंद्र सानप,पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/जयदत्त बांगर यांनी केलेली आहे.
