अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ फेब्रुवारी):-मंगल परिणय वधू वर सूचक मंडळ अहमदनगर जिल्हा आयोजित नगर औरंगाबाद रोड येथे चेतना लॉनमध्ये बौद्ध वधू वर मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यास मुला-मुलींसह पालक पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सहाय्यक अभियंता इंजि.किरण साळवे,महसूल विभागाचे गिरीश गायकवाड, मिलिंद जाधव,डॉ.संगीता खंडागळे बौद्धाचार्य बाळासाहेब धस म्हणून उपस्थित होते.सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेल्या मेळाव्यात नाव नोंदणी तसेच जुने सभासद नूतनीकरण करण्यासाठी मुला मुलींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.दुपारी दोन वाजेपर्यंत मुला-मुलींचे परिचय पत्रक भरून घेण्यात आले होते. दुपारनंतर व्यासपीठावर मान्यवरांनी आपले मेळाव्या बाबतीत मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित असलेल्या पालकांकडून अभिप्राय व सूचना घेण्यात आल्या, अध्यक्षस्थानी इंजिनियर किरण साळवे यांनी मार्गदर्शन केले. इंजिनीयर किरण साळवे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मुला मुलींचे जमा केलेले परिचय पत्रकाचे वाचन करून मुला-मुलींची आयोजकांच्या वतीने ओळख करून देण्यात आली. ओळख परिचय झाल्यानंतर परस्परांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या सर्व पालक मुला-मुलींचं एकमेकांची भेट असल्याने अनेकांचे विवाह जमत आहेत असे चित्र या मेळाव्यात दिसून येत होते.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी एस.के. गायकवाड सर,भागचंद सातपुते सर,राजू अवचर कल्पनाताई कांबळे,मानसी देठे,सोनाली वाकडे,केतन देठे हर्षवर्धन कांबळे,बाळासाहेब गोरे,बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे यांनी अथक परिश्रम घेतले.

