अहमदनगर प्रतिनिधी दि.२२ फेब्रुवारी):-अहमदनगर शहरात मंगळवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी रात्री हातात तलवारी,लाकडी दांडके घेऊन सात जणांच्या टोळक्याने चांगलीच दहशत निर्माण करत एकास व त्याच्या कुटुंबीयांना तलवारीने तसेच लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील जुनाबाजार रोडवर बॉम्बे बेकरी जवळ घडली.याबाबत महंमद अरबाज जावेद खान(वय २६,रा.जुना बाजार, बॉम्बे बेकरी जवळ)याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी महंमद खान हा व्यावसायिक असून तो मंगळवारी रात्री ८.४० च्या सुमारास बांबू गल्लीतील मस्जिमध्ये नमाज पढून त्याच्या घराकडे जात असताना बॉम्बे बेकरी समोर एका सोबत मोबाईलवर बोलता होता.त्यावेळी त्याला सलमान गफ्फार सय्यद, अरबाज रशिद सय्यद यांनी हाक मारुन थांबवले व काही कारण नसताना “तू या पुढे फोनवर बोलू शकणार नाहीस” असा दम देत त्याचा मित्र समीर सय्यद,इरफान बेग,शाहरुख रशिद सय्यद,फिरोज सय्यद,इम्रान बेग यांना बोलावून घेतले व सर्वांनी “तू हमारा नाम बहुत बदनाम कर रहा है,क्या रे बहूत पैसे पैसे करता है क्या,आज ये पानीवाले मच्छर की फडफड हमेशा के लिए बंद करते है,इसको कुचल डालेंगे” असे म्हणत त्यास मारहाण सुरू केली.त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याचे वडील जावेद जमाल खान,चुलत भाऊ फरदिन शहानवाज खान,चुलते शहनवाज जमाल खान,अय्याज मुश्ताक खान हे तेथे आले व त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.मात्र या आरोपींच्या हातात तलवारी व लाकडी दांडके असल्याने त्यांनी सर्वांना तलवारीने व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.हा गोंधळ पाहून तेथे मोठा जमाव जमा झाला मात्र या टोळक्याच्या हातात तलवारी असल्याने कोणाचीही मध्ये पडण्याची हिंमत झाली नाही.त्यानंतर सर्वांना जबर मारहाण करुन हे टोळके तेथून निघून गेले.या घटनेनंतर महंमद खान हा फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात गेला.त्यावेळी त्याला व त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पहाटे ३.१७ वाजता ७ जणांच्या टोळक्या विरुद्ध पोलिसांनी भादंविक.३०७,३४१,३२३,३२४,५०४,५०६, १४३,१४७,१४८,१४९,आर्म ॲक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत
