शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडमध्ये..कालबाह्य व परजिल्ह्यातील रिक्षांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरात कालबाह्य तसेच परजिल्ह्यात नोंदणीकृत रिक्षांवर शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली.या कारवाईत एकूण 12 रिक्षांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही दंड कारवाई करण्यात आली आहे.शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवून ही कारवाई करण्यात आली.यामध्ये वाहनांच्या काचांवर काळे आवरण लावणे – 01, परवाना सोबत न बाळगणे – 01, ट्रिपल सीट वाहन चालवणे – 06, वाहनास नंबर प्लेट नसणे किंवा फॅन्सी नंबर प्लेट बसवणे – 04, अवैध प्रवासी वाहतूक – 02, ट्रंक अँड ड्राईव्ह – 01 तसेच इतर 14 अशा एकूण 29 ई-चलन कारवाया करण्यात आल्या.
तसेच 12 कालबाह्य रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 10,300 रुपये रोख दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच एकूण 28,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि/ बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत अधिनस्त पोलीस अधिकारी व कर्मचारी अंमलदार पोऊनि.मन्सूर सय्यद,पोलीस अंमलदार रामराव शिरसाट,गणपत कर्डिले,जहिर शेख,विष्णू खेडेकर,मधुकर ससे,उंडे,सतीश दळवी,प्रवीण खंडागळे आणि वॉर्डन यांनी केली आहे.दरम्यान,नागरिकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देऊ नये,वाहनांच्या काचांवर काळे फिल्म लावू नयेत, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट वापरू नयेत तसेच मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
