Crime..कोयत्याच्या जोरावर दहशत माजवणारा व खुनाच्या प्रयत्नातील कुख्यात आरोपीचा खेळ खल्लास.. एमआयडीसी पोलिसांनी केली मोठी कारवाई..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका हद्दीत कोयत्याचा धाक दाखवत चोरी तसेच खुनाचा प्रयत्न करणारा कुख्यात आरोपी अखेर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे (रा. बोल्हेगाव ता.जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो निमगाव घाना,ता.जि.अहिल्यानगर येथे मामाच्या शेतात लपून बसलेला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.माणिक चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे हा निमगाव घाना परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनी.चौधरी यांनी तत्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचून शेतात लपलेल्या आरोपीला शिताफीने पकडले.चौकशी दरम्यान आरोपी हा नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरी व घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे समोर आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलूबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक चौधरी,पोसई मनोज मोंढे, पोलीस अंमलदार राकेश खेडकर,सचिन आडबल,संदीप पवार,राजू सुद्रिक,नवनाथ दहिफळे,अक्षय रोहोकले, ज्ञानेश्वर आघाव,जयसिंग शिंदे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांच्या पथकाने सहभाग केली.
