वर्धा जिल्हा प्रतिनिधी (गणेश हिवरे):-गिरड मोहगांव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तावी ते झमकोली या मिनी माडा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामावर मोजमाप न करता दोन ठेकेदारानी अतिक्रमण करून आप आपल्या जेसीबी सुरू केला आहे.त्यामुळे एक कली दो फुल असाच काहीसा गोडबंगाल दिसत आहे.यामुळे या रस्त्याचे काम थांबून संबंधी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप करुन काम सुरू करावे असी मागणी मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे यांनी केले आहे.वर्धा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्याला जोडणार तावी झमकोली रस्ता दुर्लक्षित होता.या रस्त्याठी सरपंच विलास नवघरे यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पाठपुरावा केला होता. यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी शेतकऱ्यांची अडचन लक्षात घेऊन तसेच दोन जिल्ह्याला जोडणार हा रस्ता असल्याने विशेष पुढाकार घेऊन अथक परिश्रमाने हा रस्ता मीनी माडा योजनेतून करुन यावर २५ लक्ष रुपये निधी मंजूर करून दिला होता.६ डिसेंबर रोजी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी तावी येथील नागरिकांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे रस्त्यासाठी विशेष आभार मानले होते.भुमिपुजनाच्या अडीच महिन्यानंतर या रस्त्याच्या कामाला २१ फेब्रुवारीला कोणत्याही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना न बोलता व मोजमाप करण्यासाठी दोन ठेकेदारांकडून जेसीबी लावून कामाला सुरुवात करण्यात आली आहे यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांमध्ये हा विचित्र प्रकार पाहून संभ्रम निर्माण झाला आहे.सरपंच विलास नवघरे यांनी कामाच्या ठिकाणी दोन्ही ठेकेदाराना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही ठेकेदार समजायला तयार नाही. संबंधित जिल्हापरिषदेचे कार्यकारी अभियंत्यांनी एकच काम दोन ठेकेदारांना कसे काय दिले पाणी कुठे मुरले मोठा प्रश्न या तावी झमकोली रस्त्याच्या कामावरून निर्माण झाला आहे.तरी प्रकारावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे व ग्रामस्थांनी केली आहे.सरपंच विलास नवघरे या रस्त्यासाठी मी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी विशेष लक्ष देऊन रस्ता मंजूर करून दिला.मात्र याठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता संबंधी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मोज माप न करता दोन ठेकेदारांना कामाला सुरुवात केली आहे.या संबंधी मी जिल्हापरिषद कार्यकारी अभियंता पेंदे यांना दुरध्वनी वरुन संपर्क करुन तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
