वर्धा प्रतिनिधी (गणेश हिवरे):- बांबर्डा येथे इंडो ग्लोबल सोशल सर्विस सोसायटी संस्थेमार्फत आष्टी तालुक्यातील 20 गावांमध्ये सुपोषण प्रकल्प राबवल्या जात असून 0 ते 6 वयोगटातील बालके,स्तनदा माता,गर्भवती माता व किशोरी मुली यांच्या पोषणात वाढ करणे या उद्देशाने प्रकल्प राबवल्या जात आहे.कुपोषण कमी करायचे असेल तर स्वच्छता सर्वात महत्त्वाची असल्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रकल्पाच्या राज्य समन्वयक एकता भारतीय मॅडम यांच्या संकल्पनेतून गावागावांमध्ये ग्राम पोषण अभियान राबवल्या जात आहे.दि.20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या तीनदिवस बांबर्डा गावांमध्ये ग्राम पोषण अभियान राबविण्यात आले असून अभियानामध्ये ग्राम स्वच्छते विषयी जनजागृती रॅली,वैयक्तिक स्वच्छता, हातधुणे प्रात्यक्षिक,उघड्यावर बाहेर गेल्यानंतरच्या हानी,संतुलित आहार,मुलींमधील मासिक पाळी विषयीचे आजार,अंधश्रद्धा,घरगुती व्यवहार इत्यादी विषयी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्पाचे तालुका समन्वय दिनेश जाने यांनी बोलताना दिली.कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकल्पाचा कशाप्रकारे गावाला फायदा होत आहे आणि त्यातून महिला कशा सक्षम होत आहे याचे प्रतिपादन गावातील सरपंच लताताई करताई मॅडम यांनी व्यक्त केले.सदर पोषण शिबिराचे नियोजन नीलिमाताई देशमुख व प्रणालीताई देशमुख कृतिशील पोषण सखी सुपोषण प्रकल्प यांनी केले असून,यशस्वी करण्याकरिता गावातील पुष्पाताई घटी मॅडम अंगणवाडी सेविका, पोषणसखी नेहाताई बच्चीरे,अर्चनाताई बंगलेकर,ग्रामविकास समिती अध्यक्ष वैशाली एमगवडी त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
