अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ फेब्रुवारी):-श्रीरामपुर तालुक्यातील कमलापूर ते भामठाणा येथे अवैध वाळु वाहतुक करणारे इसमावर कारवाई करून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केले अटक या घटनेतील सविस्तर माहिती अशी की दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रभारी अधिकारी सपोनि/ज्ञानेश्वर थोरात श्रीरामपुर यांना गुप्त बातमी मिळाली की,मौजे कमालपुर ते भामाठाण परिसरात काही इसम नदिपात्रातुन चोरुन वाळुची वाहतुक करीत आहे.अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सपोनि/ज्ञानेश्वर थोरात हे तसेच पोसई/अतुल बोरसे,पोना/प्रशांत रणनवरे,पोना/अनिल शेंगाळे, चापोकॉ/चॉदभाई पठाण व होमगार्ड लांडे असे परीसरात खाजगी वाहनाने पेट्रोलीग करीत असताना कमालपुर ते भामाठाण मार्गावर दोन ट्रॅक्टर जाताना दिसले असता त्यावरील चालकानी पोलिसांना पाहुन सदरचे ट्रॉक्टर भरधाव वेगात चालवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्याना मोठ्या शिताफिने रात्री 12/30 वा सुमारास त्यांना ताब्यात घेतले.दोन्ही ट्रॅक्टरची पाहणी केली असता ते वाळुने भरलेले दिसले असता त्याना वाळु परवाना मागितला असता त्याचेकडे वाळुचा परवाना नसल्याचे सांगितले. ट्रॅक्टर चालक यांना त्यांची नावे विचारली असता त्यंनी त्यांची नावे 1)सुनिल बाबुराव मोरे रा.भामाठाण 2) सर्फराज असगरअल्ली सय्यद रा. भामाठाण 3) शकिल लतीफ काझी रा.भामाठाण ता. श्रीरामपुर असे सांगितले, सदर ट्रॅक्टरचे मालक सर्फराज असगर सय्यद व शकिल लतिफ काझी याचे मालकीचे असल्याचे सांगितले,सदर ट्रॅक्टर चालक यांनी पोलीसांना चकवा देऊन ट्रॅक्टर वेगाने चालवुन पळवुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफिने पकडुन ताब्यात घेण्यात आले.त्यांचे विरुध्द श्रीरामपुर ता.पो.स्टे गुन्हा रजि नंबर 116/2023 भादवि कलम 379,34 पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन 1) सुनिल बाबुराव मोरे रा. भामाठाण 2) सर्फराज असगरअल्ली सय्यद रा. भामाठाण 3) शकिल लतीफ काझी रा.भामाठाण ता. श्रीरामपुर यांना दि.23/02/2023 रोजी अटक करणेत आली आहे. आरोपीकडुन जप्त केलेल्या मुद्देमालाचे
वर्णन खालील प्रमाणे
1) ८१०,००० रु किमंतीचा एक सोनालीका कंपनीचा ७४५ मॉडेलाचा निळे रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह त्यात १ ब्रास वाळु भरलेला
2) ८१०,००० रु किमंतीचा एक महेंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह त्यात १ ब्रास वाळु भरलेला.
१६,२०,००० /- रु एकुण असा मुददेमाल जप्त करुन वरील ०३ आरोपीना अटक करणेत आली असुन त्यांना मे.कोर्टाने दि.२४/२/२०२३ रोजी पर्यंत पो.क रिमांड मंजुर केली आहे. पुढिल तपास पोसई/अतुल बोरसे हे करीत आहेत.सदरची कामगीरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि श्री.संदिप मिटके उपविभागिय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
