Lcb..स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई..विमान इंधन माफिया टोळीचा पर्दाफाश..काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला लाखोंचा माल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे विमानासाठी वापरले जाणारे ATF (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) इंधन चोरी करून काळा बाजारात विक्रीसाठी साठवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.या कारवाईत तब्बल 88 लाख 58 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.दि.05 एप्रिल 2026 रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर,दिपक घाटकर,संतोष खैर,गणेश धोत्रे व चालक उमाकांत गावडे यांचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान,पो.नि.किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गव्हाणवाडी येथील हॉटेल महाराजाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे (कर्जत उपविभाग) यांच्या उपस्थितीत पथकाने तात्काळ छापा टाकला. छाप्यात इंडियन ऑइल कंपनीच्या टँकर (MH 04 LQ 6865) मधून ATF इंधन ड्रममध्ये काढताना 3 आरोपी रंगेहात पकडले.
🚔 अटक करण्यात आलेले आरोपी:
मुकेश रामअकबाल सिंग (वय 26 वर्षे) – रा. अहियापुर, ता. मछलीशहर, जि. जौनपूर (उत्तरप्रदेश),रामभवन रामतिरथ राजपुत (वय 32 वर्षे) – रा. पिप्राइसमाईल, पो. फतेपुर, ता. मनकापुर, जि. गौंडा (उत्तरप्रदेश),चंदु शिवराम जांभळकर (वय 41 वर्षे) – रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर,तपासात उघड झाले की, आरोपी टँकरचे सील तोडून ATF इंधन चोरी करत होते आणि ते काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवले जात होते.
🕵️♂️ मुख्य सूत्रधार फरार
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीष भिमसिंग (रा. पिंपरी, पुणे) हा सध्या फरार असून त्याच्यासह इतर साथीदारांचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.
💰 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
28,000 लिटर ATF इंधन – ₹45,91,870,टाटा कंपनीचा टँकर – ₹40,00,000,12,000 लिटर ATF इंधन (06 लोखंडी टिपाडे) – ₹1,96,800,इंधन काढण्याचे इंजिन व साहित्य – ₹15,000,17 लोखंडी टिपाडे – ₹34,000,20 प्लॅस्टिक ड्रम – ₹20,000,इतर साहित्य – ₹1,100,
👉 एकूण मुद्देमाल: ₹88,58,770
या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 84/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 287, 288, 318(4), 303(2) तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 (कलम 3, 7) आणि स्फोटके अधिनियम 1884 (कलम 9(b)) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👮♂️ वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.विमान इंधनासारख्या अतिसंवेदनशील पदार्थाची चोरी करून काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेणे हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
