अहमदनगर प्रतिनिधी(दि.24 फेब्रुवारी):-२३ फेब्रुवारी २०२३ रोजी स्नेहालय,जिल्हा महिला व बालविकास विभाग,जिल्हा बालसंरक्षण विभाग,बाल कल्याण समिती, चाईल्ड लाईन,आणि अकोले पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उडान बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेत अकोले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री.राहुल शेळके यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की,जिल्हास्तरांपासून तर ग्रामीण आणि वार्ड स्तरावर पर्यंत बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यासाठी 10 जून 2014 रोजी चा शासनाचा अधिसूचनेप्रमाणे स्थापना करणे आवश्यक आहे.बाल संरक्षण समितीमुळे अनेक बालकांचा समस्या आपल्या गाव स्तरावर सुटेल.या बाल संरक्षण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सरपंच,सदस्य सचिव मुख्य अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस पाटील, सामाजिक संस्थांचे 2 प्रतिनिधी 14 ते 18 वर्षातील एक मुलगी व मुलगा अशी समितीमध्ये बालसंरक्षण समिती समावेश आहे. यामुळे अकोले तालुक्यात सर्वच गावत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करावी यांचे सूचना करून बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी बाल संरक्षण समिती ने पुढाकार घ्यावा…. गट विकास अधिकारी मा.श्री. राहुल शेळके यांनी सर्व ग्रामसेवक व सरपंच, अंगणवाडी सेविका चे सुपरवायझर, शिक्षक, गट विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना आव्हान केले. पुढे त्यांनी सांगितले की, बालस्नेही गाव बनवणे गरजेचे आहे.महिला व बाल विकास विभाग मार्फत 10 टक्के बजेट आहे. तर ते या विषयासाठी वापरणे आवश्यक आहे बालविवाह प्रतिबंधक अभियान, बालकामगार, शाळा बाह्य बालके, अशा बालकांचे विषयाची माहिती ची जनजागृती करावी. गावात लोकसंख्या पैकी महिला आणि बालकांच्या संख्या 60 टक्केचा समवेश आहे. त्यामुळे आपल्या नियोजनात बालकांचे संरक्षण समोर ठेवून आपल्या नियोजनाचा आराखडा तयार करावा. आपल्या भागात बालविवाह होत असेल तर, चाईल्ड लाईनच्या मोफत क्रमांक 1098 यावर संपर्क साधून चाईल्ड लाईन आणि उडान टीमची मदत घ्यावी यामुळे आपले नाव गुपित राहील आणि बालविवाह सुद्धा थांबविला जाईल. करणे आवश्यक आहे. सरपंच प्रथम नागरिक आहेत. अशा बाल संरक्षण समिती दर तीन महिन्यांनी मासिक बैठक घ्यावी. बालकांच्या समस्या बालकतेच्या बालकामगार शाळाबाह्य मुले अशा सर्व विषयांवर चर्चा करून त्याच्यावर उपयोजना करावी. त्याचबरोबर यानंतर उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाची प्रस्ताविक उडान चे समन्वयक, प्रवीण कदम यांनी मांडून त्यांनी सांगितले की, स्नेहालय मागील ३३ वर्षापासून महिला, बालकांसाठी, झोपडपट्टीतील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात सुद्धा काम करत आहे. त्यामध्ये अनेक वेगळे प्रकल्प वेगवेगळ्या समस्यांवर सुद्धा काम केले जात आहे. कोरोना मुळे लोक डाऊन पडल्याने अनेक प्रकारचे वेगळ्या समस्या गोरगरिबां च्या समोर आल्या. यामुळे दररोजच्या हाताची कमाई बंद पडल्याने. उपासमारी सुरू झाली होती. शाळा बंद मुली सतत घरात असल्याने. त्यांना सुरक्षित वातावरण, गरिबी, कमी लोकांमध्ये लग्न लावून देणे, मुलाकडूनकडून हुंडा देण्याची पद्धत, “हुंडा आम्ही देतो पण मुलगी आम्हाला द्या”, अनेक अशा अनेक गोष्टीचा फायदा घेऊन अनेक पालकांनी अल्पवयीन वयातच मुलींचे आणि मुलांचे बालविवाह लावून दिले. पण अनेक जागरूक नागरिकांनी बालविवाह थांबवण्यासाठी चाईल्ड लाईन ची १०९८ या मोफत क्रमांकावर माहिती देऊन अश्या ३५० पेक्षा जास्त बालविवाह प्रतिबंधक केले. स्नेहालय पुढाकार घेऊन अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याचे ध्येय निश्चित केले. आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन हे तीन उद्दिष्ट समोर ठेऊन बालविवाह प्रतिबंधक अभियान सुरू करण्यात आले आहे. यानंतर चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना चाईल्ड लाईन विषियी माहिती दिली. त्यांनी चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बालविवाह आणि काळजी व संरक्षण येणारे बालकांना विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी बालविवाह, बाल कामगार, बाल भिक्षुक, बाल संगोपन , फुस लावून अल्पवयीन मुलींना पळून नेणे, त्या बालकांवर अत्याचार चे प्रकरणे, अशा अनेक जिवंत उदाहरण सांगितले. पुढे अकोले पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले की, उडान या अभियान अहमदनगर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी किंवा झाल्यानंतर त्यांचे सतत सहकार्य लाभले आहे. आमच्यामध्ये सुद्धा खूप याविषयी जनजागृती हे अभियानामुळे निर्माण झाले आहे. आम्ही अभियानाची मदत घेऊन अकोल्यात तीन गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. या तिन्ही प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आम्हाला मिळाले आहे. यामुळे उडान अभियानाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आजचा हे अभियानामार्फत अकोले तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सरपंच अंगणवाडी सेविका यांची सुपरवायझर यांचा साठी हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आणि मुलाचे असणार आहे. आम्ही सोबत काम करत असताना फिर्याद कशी दाखल करायची, त्यापासून तर पुढे कोर्टात कोणत्या प्रकारचे जबाब आणि कोणते कागदपत्र सहित हजर करणे या गोष्टीची उणीव असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. पण या प्रशिक्षणानंतर येणाऱ्या अडचणी नक्की कमी होईल. यानंतर बालकल्याण समितीच्या सदस्य रोहिणी कोळपकर यांनी काळजी व संरक्षणाचा अंतर्गत येणाऱ्या बालकांविषयी माहिती देत अहमदनगर जिल्ह्यातील बालकल्याण समिती विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बालकल्याण समितीमध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असे पाच जणांची समिती असते. या समितीसमोर काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना सादर केले जाते. यासाठी सर्व सरपंच आणि ग्रामसेवकांना बालविवाह थांबवलेल्या आणि बालविवाह झालेल्या बालकाला बालकल्याण समितीसमोर सादर करणे बंधनकारक च आहे. बाल कल्याण समिती समोर हजर केल्यानंतर त्या बालकाचे समुपदेशन केले जाते, त्या बालकाची वयाची खात्री केली जाते, गंभीर परिस्थितीचा विचार करून त्या बालकाला सुरक्षित वातावरणात समितीच्या आदेशाने निवारा मिळून दिला जातो. आणि पुढील बाल संरक्षण समिती आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना त्या बालकाचा विकासासाठी तिचा वय पर्यंत पाठपुरावा करून त्या बालकाला दर पंधरा दिवसाला समुपदेशन करण्यासाठी बालकल्याण समितीसमोर सादर करण्याचे आदेश सुद्धा दिले जाते. त्या बालकांचा पुन्हा बालविवाह होणार नाही यांची जबाबदारी दिली जाते.
*बालविवाह लावण्यासाठी उपस्थित राहाल तर सर्वच पाहुणे राहणार कारवाईस पात्र….*
बालविवाह होऊच नये यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत.बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि आर्थिक दंड होऊ शकतो, परंतु, या कायद्यांना न जुमानता लपूनछपून बालविवाह करण्याचे प्रमाण व बालविवाह तत्परतेने थांबवण्याचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होत आहे.त्यामुळे पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या अनेक रूढी समाजातून हद्दपार होऊ लागल्या आहेत.भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व आता सर्वत्र रुळू लागले आहे.मात्र अजूनही ” मुलगी झाली हो ” हे सांगतानाचे चेहऱ्यावरील नैराश्य अनेक जण लपवू शकत नाहीत.मुलगी म्हणजे ओझे ही भावना अद्यापही समाजात कायम असल्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढत आहे.मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ पेक्षा कमी असणाऱ्या लग्नसमारंभासाठी यापुढे ग्रामसेवक,पुरोहित, (सर्व धर्माचे),फोटोग्राफर,आचारी, मंडप डेकोरेशन,वाजंत्री पथक,डीजे, उपस्थिती पाहुणे तसेच संबंधित बालकाचे आईवडील हे जबाबदार राहणार आहे, हे सर्व जण दोन वर्षाच्या सक्षम कारावासास पात्र असतील.त्यामुळे शासनाचे कान, डोळे जागरूक ठेवून या सर्वांनी असा विवाह होऊ देवू नये. महिला व बाल विकास विभाग यांचे सुधारित परिपत्रक अधिसूचना २१ ऑक्टोबर २०२२ नुसार प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत.अहमदनगर जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी,विशेष बाल पोलीस पथक, यांचेमार्फत या परिपत्रकाची अंमलबजावणी होणे बंधनकारक आहे.तसेच गावाच्या ग्रामसेवकासोबतच लग्न लावून देणारे पुरोहित,(सर्व धर्माचे),प्रिंटींग प्रेस प्रिंटर्स, मंडप डेकोरेशन,फोटोग्राफर, आचारी,मंगल कार्यालायचे व्यवस्थापक तसेच उपस्थित असणारे वऱ्हाडी,पाहुणे मंडळी यांना यापुढे आपल्याला काय करायचे अशी बेजबाबदार भूमिका घेता येणार नाही. उलट अशाप्रकारे होणारा बाल विवाह निर्दशनास आल्यास संबंधित अधिकारी यांचे निर्देशनास आणून देण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे.अशा प्रकारचा बालविवाह झाल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी वरील सर्व संबंधित बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये कलम ९,१०,११ च्या कायदेशीर कारवाईस पात्र असतील. तसेच २ वर्षाचा सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड होऊ शकतो. ग्रामसेवक यांना १६ (३) च्या नुसार बालविवाह प्रतिबंध अधिकारी तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे अशाप्रकारचे कोणताही बालविवाह झाल्यास त्यासंबंधी पुरावे गोळा करणे आणि जर वधू किंवा वर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या साह्याने न्यायालयात प्रकरण दाखल करू शकतात व अशाप्रकारे झालेला बालविवाह रद्दबातल ठरवू शकतात व त्याबाबतची माहिती मासिक त्रैमासिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,बाल कल्याण समिती यांना सादर करतील.यापुढे अशा प्रकारचे कोणतेही बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती,विशेष बाल पोलीस पथक बाल कल्याण पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधून नागरिकांनी बालविवाहाबाबतची माहिती देण्याचे आवाहन स्नेहालय संचलित उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानचे जिल्हा समन्वयक प्रवीण कदम यांनी केले आहे.
