संविधान नगरात निळा झंझावात..! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या महिला आघाडी शाखेचे पक्षाचे मुख्यनेते ‘राजूभाई साबळे’ यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन..!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा शहरात झपाट्याने विस्तार होत असून, मुकुंदवाडीतील संविधान नगर, मुकुंदनगर येथे पक्षाच्या नवीन महिला आघाडी शाखा नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले.पक्षाचे मुख्यनेते राजूभाई साबळे यांच्या हस्ते या शाखेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.यावेळी राज्य उपाध्यक्ष ॲड.अविनाश थिट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षविस्तार जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे आणि नवनियुक्त कामगार आघाडी शहराध्यक्ष संतोष उनवणे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली या शाखेची स्थापना करण्यात आली आहे.आगामी काळात जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही शाखा केंद्रबिंदू ठरेल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.शाखा अनावरण प्रसंगी परिसरातील सक्रिय महिला कार्यकर्त्यांची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यात खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे:
अध्यक्ष: शकुंतला उनवणे
उपाध्यक्ष: ज्योती सोनवणे
सचिव: रमा म्हस्के
कोषाध्यक्ष: कविता गव्हाणे
सल्लागार: संगीता गिराम
सदस्य: पार्वती वंजारे, मारोती गव्हाण, कैलास गिराम
दिग्गजांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
या सोहळ्याला मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, अशोक गायकवाड, जयनाथ बोर्डे यांची विशेष उपस्थिती होती.तसेच शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर, हनु नाना, कलीम खान, गणेश गौरये, पायलट मोरे, अतुल सोनवणे, करण सोनवणे, सुमित मोरे, रवींद्र जाधव, सम्राट मोरे, योगेश उनवणे, किरण वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.”या शाखेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर आमचा भर राहील,” असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या विस्तारामुळे मुकुंदवाडी परिसरात पक्षाची ताकद कमालीची वाढली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
