छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘निळा’ धमाका..! राजुभाई साबळेंच्या उपस्थितीत सचिन नवगिरे अन् वैभव लोखंडेंचा समर्थकांसह ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’मध्ये जाहीर प्रवेश!
छत्रपती (संभाजीनगर प्रतिनिधी):-आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरे आणि सक्रिय कार्यकर्ते सचिन नवगिरे आणि वैभव लोखंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.रविवारी १० मे रोजी जवाहर कॉलनी येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पक्षप्रवेश पार पडला.पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामुळे शहरासह मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जबाबदारीचे नवे खांदे:नवगिरे व लोखंडेंची ‘मोठ्या’ पदावर नियुक्ती
केवळ पक्षात प्रवेशच नाही,तर या दोन्ही नेत्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष प्रमुख राजुभाई साबळे यांनी त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
सचिन नवगिरे: मराठवाडा कार्याध्यक्ष (पक्षाचा मराठवाड्यातील विस्तार करण्याची महत्त्वाची धुरा).
वैभव लोखंडे: राज्य सहसचिव (राज्य पातळीवर पक्ष बांधणीसाठी नियुक्ती).
फईम शेख: शहर सरचिटणीस पदी नियुक्ती.
यावेळी केवळ प्रमुख नेतेच नव्हे, तर त्यांच्यासोबत फईम शेख, फकरीचंद सदाशिव, विजय सोनवणे, गणेश बोर्डे, देवराज सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, राजकुमार साळवे, शांतीलाल गायकवाड, संघपाल खंडागळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी निळ्या झेंड्याखाली येत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची ताकद शहरात आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
या सोहळ्याला पक्षातील बड्या नेत्यांची मांदियाळी होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांनी मानले.
प्रमुख उपस्थिती:
सुनील खरात (मराठवाडा उपाध्यक्ष)
रणजीत मनोरे (शहर अध्यक्ष)
रवि मोरे (जिल्हा सरचिटणीस)
प्रकाश घोरपडे, आनंद तायडे, सुनील वाहूळ (ज्येष्ठ नेते)
“आंबेडकरी चळवळीतील तरुणाईला सोबत घेऊन समाजाच्या प्रश्नांसाठी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांच्या प्रसारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राजुभाई साबळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र घराघरात पोहोचवू,” असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
