महामानवाचा वारसदार..भीमसैनिकांचा बुलंद आवाज..! ना.रामदास आठवले यांचा १४ मे रोजी कनगरमध्ये भव्य नागरी सत्कार..पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल,अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या दैदिप्यमान वाटचालीचा गौरव करण्यासाठी गुरुवार,दि.१४ मे २०२६ रोजी राहुरी तालुक्यातील कनगर येथे सायंकाळी ७ वाजता ‘भव्य नागरी सत्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि शहराध्यक्ष कैलास कासार यांनी या ऐतिहासिक सोहळ्याची अधिकृत माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या सोबतच माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि आमदार अक्षय कर्डिले यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.आंबेडकर चळवळीतील एक झुंजार आणि लढाऊ नेतृत्व म्हणून ना.रामदास आठवले यांची ओळख संपूर्ण देशाला आहे.महाराष्ट्रातून तीन वेळा लोकसभेवर आणि आता सलग तीन वेळा राज्यसभेवर निवडून जाण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.विशेष म्हणजे, सलग तीन वेळा ‘केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री’ म्हणून काम करण्याची संधी मिळवून त्यांनी दलित,शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय दिला आहे.
त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे.या कार्यक्रमाला रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, विजयराव वाकचौरे,राजाभाऊ कापसे,विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल,दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे,ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, सुभाषराव त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.महिला आघाडीच्या वतीने रमाताई धीवर,जिल्हाध्यक्षा सीमाताई बोरुडे,स्नेहल दिवे, रुपाली सोनवणे व वैशाली सोनवणे यांसह जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी आपली उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शवणार आहे.तालुकाध्यक्ष: अनिल ननवरे (कोपरगाव), विलास साळवे (राहुरी), सुनील शिरसाट (श्रीरामपूर), सुशील धायजे (नेवासा), धनुभाऊ निकाळे (राहाता), राजेंद्र गवांदे (अकोले), आशिष शेळके (संगमनेर).शहर व इतर पदाधिकारी: नानाभाऊ त्रिभुवन (शिर्डी), पप्पूभाई सय्यद, युनूस भाई शेख (मुस्लिम आघाडी), करण कोळगे, पप्पू इंगळे, विजय राजगुरू, संतोष मोरे, संजय बनसोडे,नितीन भालेराव हे सुद्धा प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
