संगमनेर प्रतिनिधी (दि.२७ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात साकूर-मांडवा रोडवरील भगवान पेट्रोल पंपावर आज्ञात तीन इसमांनी पेट्रोल भरण्याचा बहाणा करून पेट्रोल पंपावरील कर्मचार्यास पिस्तुलाचा धाक दाखवून जवळपास 2 लाख 50 हजार 747 रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन इसमाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
