नागपूर प्रतिनिधी (दि.२८ फेब्रुवारी):-सालाबादा प्रमाणे या वर्षी तिष्टी बुजरूक येथे समस्त ग्रामवासियांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात भागवत ज्ञानकथा सप्ताहाची दि.25 फेब्रुवारी रोजी शनिवारी सुरुवात झाली. भागवत कथा ज्ञान यज्ञाची परंपरा ही गेल्या दहा वर्षापासून येथे सुरू आहे यातून समस्त ग्रामवासी भागवत कथेचे श्रवण करून संस्कारक्षम जीवन जगण्याचा प्रयत्न करतात यातून तरुण वर्ग नवीन पिढीला योग्य जीवन जगण्याची चालना प्राप्त होते हा मुख्य उद्देश आहे.भागवत कथाकार ह.प. भ.श्री.उमेशजी जाधव महाराज (नांदगाव खंडेश्वर जी.अमरावती) यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथेला आज प्रारंभ झाला.यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच बाहेर गावचे पाहुणे देखील मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी भागवत कथा प्रवचनकार श्री.उमेश महाराज जाधव यांच्या शुभहस्ते कलश स्थापना व पूजा करण्यात आली.तसेच याप्रसंगी श्री. गजाननराव तांदूळकर (तालुका अध्यक्ष-मानव अधिकार सुरक्षा संघटना) मूळचे तिष्टी येथील रहिवासी यांनी देखील भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.श्री.रविंद्रजी खेडकर (अध्यक्ष मानव अधिकार सुरक्षा संघटना नागपूर जिल्हा तथा उपसंपादक सिटी इंडिया मराठी न्यूज,महाराष्ट्र न्यूज नागपूर जिल्हा प्रतिनिधी) तसेच श्री.राजूभाऊ नानवटकर (अध्यक्ष ग्रामीण नागपूर जिल्हा मानवाधिकार सुरक्षा संघटना नागपूर) हे यावेळी उपस्थित होते.
