अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ फेब्रुवारी):-वडगाव गुप्ता येथील हार्मनी इंटरनॅशनल शाळेमध्ये 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक बेरड सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमात शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.अशोक पाटोळे सर व डॉ.सुवर्णा पळसकर उपस्थित होते.साहित्यिक क्षेत्रात मराठी भाषेला असणारा दर्जा किती श्रेष्ठ हे कुसुमाग्रजांच्या काव्य लेखनातील एक अमूल्य असा ठेवा होय हा ठेवा सर्वांनी जपायला हवा असे आवाहन या कार्यक्रमाचे प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका शीला बडेकर यांनी केले तर कुसुमाग्रजांच्या साहित्याची पार्श्वभूमी ज्येष्ठ शिक्षिका मनिषा दांगट यांनी सादर केली.विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज हे नाव कसे प्राप्त झाले हे त्यांच्या जीवन परिचयातून शिक्षिका राजश्री निंबाळकर यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या भाषणाने व सुंदर अशा मराठी गीताद्वारे मराठी भाषेचा श्रेष्ठ सांस्कृतिक वारसा जतन करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाची सांगता शाळेच्या शिक्षिका शीतल पंडीत यांनी केली.
