‘चलो अहिल्यानगर!’ अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणा विरोधात १२ जुलै रोजी भव्य जिल्हाव्यापी बैठक..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाला छेद देणारी ‘अनुसूचित जातीची उपवर्गीकरण प्रक्रिया’ तात्काळ रद्द करण्यात यावी,या मुख्य मागणीसाठी अहिल्यानगर शहरात जिल्हा पातळीवर एका महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी रविवार,दि.१२ जुलै रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता एका भव्य जिल्हाव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही महत्वपूर्ण बैठक अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ बुद्ध विहार,सिद्धीबाग येथे संपन्न होणार आहे.’समस्त आंबेडकरी बौद्ध समाज’ यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन या जिल्हाव्यापी बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम भिमसैनिक,सर्व संघटना व सर्व पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व मतभेद आणि मनभेद विसरून अत्यंत मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
