Maharashtra247

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्हा रुग्णालय येथे गोरगरीब रुग्णांना मोफत श्रवणयंत्र(कानाचे मशीन) केले जाणार वाटप;जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा सिव्हील सर्जन डॉ.संजय घोगरे यांचे आवाहन

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ मार्च):-जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे गोरगरीब रुग्णांना मोफत श्रवणयंत्र (कानाचे मशीन) महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी दिली.जागतिक कर्ण बधिरता दिना निमित्त कर्ण बधिरता सप्ताह 1 मार्च २०२३ ते ८ मार्च २०२३,दर वर्षी ३ मार्च २०२३ हा जागतिक कर्ण बधिरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या निमित्त जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे 1 मार्च २०२३ ते ८ मार्च २०२३ या कालावधीत कर्णबधिरता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे Earand hearing care for alll Let’s make it reality” हे घोषवाक्य आहे.या सप्ताहात जिल्हा रुग्णालयात कर्ण बधिरता आजाराशी संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.या सप्ताहाचे औचीत्य साधून २ मार्च २०२३ पासून जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत गरजू रुग्णांना मोफत श्रवण यंत्र वाटपाची सुरुवात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आली.या वेळी जिल्हा रुग्णालयातील कान नाक घसा तज्ञ डॉ.कटारिया,डॉ.गुरवले,डॉ.मनोज घुगे,डॉ.पहोळे तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.मयूर मुथा,श्री. रोहित कारंडे उपस्थित होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत श्रवण यंत्र योजनेचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.मयूर मुथा यांनी या योजनेबद्दल माहिती सांगताना असे सांगितले कि,ज्या रुग्णाकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल असे रुग्ण या योजनेचा लाभ घेवू शकतात. त्या साठी गरजू रुग्णांनी जिल्हा रुग्णालयातील महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयात (कार्यालय क्र.५२) रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेवून नोंदणी करावी तसेच गरजू रुग्णांनी जिल्हा रुग्णालयातील कान नाक घसा विभागात तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page