नगर अर्बन बँकेच्या मा.संचालकांना पासपाेर्टची साक्षांकित प्रत आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे आदेश
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँकेतील कर्जप्रकरणात झालेल्या गैरव्यवहाराच्या फिर्यादीमुळे मागील काळातील काही संचालक व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या पासपोर्टची साक्षांकित प्रत आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले.त्याचबराेबर संबंधित अधिकारी,संचालकांना पाेलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय अहमदनगर शहराच्या बाहेर जाण्याची मुभा नसल्याचे निर्देश देण्यात आले,अशी माहिती पाेलीस प्रशासनाकडून देण्यात आली. जवळपास २८ कर्ज प्रकरणात १५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेली आहे.गांधी यांनी पाेलीस अधीक्षकांना केलेल्या मागणीनुसार गैरव्यवहाराच्या सर्वच कर्जप्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. या प्रकरणाचा अहवाल न्यायालयास सादर झाल्यावर पाच वर्षांच्या काळातील संचालक व अधिकारी फरार होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचे म्हटले आहे.