अहमदनगर येथील रहिवासी असलेले व अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टीत छाप पाडणारे सुमित दिलीप तनपुरे यांच्या फतवा चित्रपटाचे पुण्यात हडपसर येथे प्रमोशन,प्रसिद्ध गायक सोनू निगम यांची सहा गाणी या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार ऐकायला
अहमदनगर प्रतिनिधी (दि.५.डिसेंबर):-मराठी चित्रपटातील दिग्दर्शक प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत यांचा प्रेम कहानीवर आधारित मराठी फतवा चित्रपट येत्या ९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.या चित्रपटाचे पुण्यातील हडपसर मधील शेवाळेवाडीत अभिनेता सुभाष यादव यांच्या कार्यक्रमात शानदार प्रमोशन करण्यात आले.यावेळी या चित्रपटातील सहकलाकारांना पाहण्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.या चित्रपटात नगर येथील रहिवासी असलेले सुमित दिलीप तनपुरे यांची या चित्रपटात सहखलनायकाची भूमिका असणार आहे. तसेच छाया कदम,मिलिंद शिंदे,नागेश भोसले,संजय खापरे,अमोल चौधरी,निलेश वैरागर,निखिल निकाळजे, पुनम कांबळे,सोना,आकाश,वैभव,सादिक,किरण,शरद दिसणार आहेत.या चित्रपटाची डॉ.यशवंत,प्रेमा निकाळजे,अनुराधा पवार यांनी निर्मिती केली आहे.या चित्रपटातील गीत प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गायले आहे.वेगवेगळ्या रंगातील सहा गाणी या चित्रपटात प्रेक्षकांसाठी बाबा चव्हाण यांनी लिहिली आहेत.काही दिवसातच नगर मधील नावाजलेल्या महाविद्यालयात या चित्रपटाचे प्रमोशन होणार असून नगरमधील वेगवेगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांनााा पहावयास मिळणार आहे.