केडगाव बायपास येथे गोळीबार करून खून व जबरी चोरी करणारे तीन आरोपी एलसीबी कडून अटक;आयजी बि.जे.शेखर पाटील यांच्याकडून एलसीबी टीमला वीस हजार रुपये रिवार्ड घोषित
अहमदनगर प्रतिनिधी दि.५ मार्च):-केडगाव बायपास येथील हॉटेल के ९ समोर गोळीबार करून खूनासह जबरी चोरी करणारे तसेच संगमनेर तालुक्यातील साकुर येथील भगवान पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना चाकूचा व गावठी कट्ट्याचा भाग दाखवून रोख रक्कम बळजबरीने चोरणारे व घारगाव शिवारातील लक्ष्मी टायरचे दुकानातील जबरी चोरी करणारे सराईत तीन आरोपींची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी की दिनांक 23 फेब्रुवारी रोजी फिर्यादी श्री. अरुण नाथा शिंदे (वय ४५ राहणार नेप्ती तालुका नगर) हे त्यांचे मित्रा सोबत हॉटेल के 9 समोर दारू पीत बसलेले असताना अनोळखी तीन ईसम हातात चाकू व पिस्टल घेऊन आले व फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून तुमच्या जवळील पैसे काढून द्या असे म्हणतात फिर्यादी व त्यांचा मित्र पळू लागताच एकाने हातातील पिस्टलने फिर्यादीचा मित्र नामे शिवाजी किसन उर्फ देवा होले यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून केला व फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पुडी टाकून त्यांचे जवळील रोख व मोबाईल फोन असा एकूण 6000/रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला या घटनेबाबत फिर्यादी यांनी कोतवांली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 186/२०२३ भादविक 397,302,34 सह आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे खूनासोबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी घारगाव शिवारात रात्रीचे वेळी अनोळखी तीनच इसमानी पुणे ते नाशिक जाणारे रोड लगत असलेले लक्ष्मी टायर पंचर दुकानात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून दुकानातील इसमाजवळील व दुकानासमोरील 34 हजार 500 रुपये किमतीची मोटर सायकल मोबाईलवर रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती.आणखीन पुढे जाऊन त्याच तीन जणांच्या टोळीने साकुर ते मांडवे जाणार रोडवर भगवान पेट्रोल पंप संगमनेर येथे पंपावर काम करणारे कर्मचाऱ्यांना चाकू व गावठी कट्ट्याचा भाग दाखवून पंपावरील 2 लाख 50 हजार 747 रुपये रोख असा एकूण दोन लाख 85 हजार 287 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता सदर दोन्ही घटनेबाबत घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 93/2023 भादविक 392,394 सह आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथके नेमून गुन्ह्याचा तपास करून आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.विशेष तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करून व तसेच नगर तालुका शहर परिसरातील बायपास व इतर रोडवरील हॉटेल,लॉज, ढाबे व पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्या आधारित तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती घेतली या तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की केडगाव बायपास रोडवरील खुनाचा गुन्हा हा आरोपी नामे अजय चव्हाण राहणार वळण पिंपरी तालुका राहुरी यानी त्याचे साथीदारा सोबत केलेला असून तो त्याच्या घरी आला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्री.कटके यांनी पथकास ही माहिती कळवून कारवाई करण्याच्या आदेश दिले होते पथकाने आरोपी नामे अजय चव्हाण याच्या राहत्या घरी वळण पिंपरी तालुका राहुरी येथे जाऊन त्याच शिताफीने ताब्यात घेतले व तसेच इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली.यातील अजय चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर पुणे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 11 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच सागर जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहेत.आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही पुण्यातून त्यांनी चोरी केलेले आहे.आरोपींकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बि.जे.शेखर पाटील यांनी या कारवाई बद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला वीस हजार रुपये रिवार्ड घोषित केले.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री.प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, श्री.संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग,पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे,संदीप घोडके,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,पोना/शंकर चौधरी,विशाल दळवी रवीकुमार सोनटक्के,दीपक शिंदे,सागर ससाने,रोहित येमुल, रणजीत जाधव,मयूर गायकवाड,मेघराज कोल्हे, मपोना/भाग्यश्री भिटे,चापोहेकॉ/उमाकांत गावडे,संभाजी कोतकर,चापोना/भरत बुधवंत यांनी केली आहे.