Maharashtra247

बैलाच्या गोठ्याला अज्ञात इसमाने लावली आग, शेतीच्या साहित्याची राख रांगोळी जवळपास एक लाख रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान,आसपासच्या शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून भारपाई देण्याची मागणी                                       

 

वर्धा प्रतिनिधी (गणेश हिवरे):-समुद्रपुर तालुक्यातील खेक या गावाबाहेर मोकळ्या जागेत असलेल्या बैलाच्या गोठ्याला अचानक आग लागली,यात शेतकरी दामोदर नत्थु ठाकरे यांच्या मालकीचे शेती उपयोगी साहित्य,स्प्रीकल पाईप,बैलाचा चारा,नांगर,वखर,टिना सह संपुर्ण गोठा जळुन राख झाला शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती तहसीलदार राजु रनविर,ठाणेदार दहीभाते यांना मिळताच अग्नीक्षमन बोलावून त्यांनी आग आटोक्यात आणली असून हे घटना शनिवार ता.४ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अज्ञात वक्तीनी गोठ्याला आग लावुन गोठा पुर्णता जाळला.गोठ्यात शेतीचे सामान स्प्रीकल पाईप बैलाचा चारा जाळुन राख झाला तर एक शेळीलाआगीचे चटके लागले.आग लागल्याचे गावकऱ्यांना कळताच गावकरी धावुन गेले व आग पाण्याच्या साय्याने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.आणली खेक गट ग्रामपंच्यातीचे सरपंच विलिस तिमांडे यांनी आग लागल्याचे माहिती समुद्रपुर तहसीलचे तहसीलदार गिरड पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना माहिती दिली.आणि आग त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक गाडी बोलावुन आग पुर्णता विझविण्यात आली.आगीत जवळजवळ एक लाखाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यानी दिली.नुकसान गस्त शेतकऱ्यांला शासनाने मदत त्वरीत द्यावी अशी मागणी आसपासच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page