Maharashtra247

फेसबुकवरची ओळख तरुणीला पडली महागात

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ मार्च):-सोशल मीडियाचा आजकाल जास्त वापर होत आहे.नगर शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नगर शहरात राहणार्‍या पीडित तरुणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुजित गुगळे (रा.साईनगर, बुरूडगाव रोड) याच्या विरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान वेळोवेळी ही घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी तरुणीची डिसेंबर 2021 मध्ये सुजित सोबत फेसबुकवर ओळख झाली होती.ते दोघे फोनवर बोलत होते.फिर्यादीने त्याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली असता त्याने होकार दिला होता.सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुजित हा फिर्यादीच्या घरी आला होता. आपण लग्न करणार आहोत, असे त्याने फिर्यादीला सांगितले व संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.दरम्यान फिर्यादीला त्याने अधिक विश्वासात घेऊन बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवले.25 फेब्रुवारी,2023 रोजी सुजित फिर्यादीच्या घरी गेला असता फिर्यादीने आपण लग्न कधी करणार आहोत,अशी विचारणा केली.घरच्यांनी तुझासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचे त्याने सांगितले.त्यांच्यात तेथे वाद झाले.यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.तिने शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस कोतवाली उपनिरीक्षक मनोज कचरे हे करीत आहेत.

You cannot copy content of this page