श्री संताजी महाराज सभागृहाकरिता निधी उपलब्धकरून देण्यासाठी समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
वर्धा प्रतिनिधी (गणेश हिवरे):-आर्वी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात तेली समाज असून समाजाचे एकही सार्वजनिक सभागृह वा समाजभवन नाही.त्यामुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अडचणी निर्माण होतात.याबाबीचा विचार करून माजी नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक श्री.सुमित वानखेडे यांना समाजभवन निर्माणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.माजी नगराध्यक्ष सव्वालाखे यांनी संताजी बहुउद्देशीय संस्था,आर्वीच्या विनंतीनुसार नगरपरिषद क्षेत्रातील जागा उपलब्ध करून दिली होती.परंतु सत्ताबदल व कोरोना काळ यामुळे नगर परिषदला कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही.आता निधी उपलब्ध होत आहे.सुंदर व भव्य संताजी महाराज सभागृह बांधकाम करण्यासाठी निधीबाबत सुमितभाऊ वानखेडे यांना प्रा.प्रशांत सव्वालाखे यांच्या नेतृत्वात डॉ.वसंतराव गुल्हाने, डॉ.दिवाकर ठोंबरे,डॉ.प्रकाश धांदे,डॉ.प्रा.सुरेंद्र गोठाणे, प्रा.अरुण कहारे,जगन गाठे, प्रकाश गुल्हाने,अशोक जीरापुरे,अविनाश पंचगडे, प्रकाश जयसिंगपूरे,अविनाश टाके,रवींद्र गोडबोले,संजय खुणे,पंकज गोडबोले,संदीप शिंगाने,सुमित शिंगाणे,भरत जयसिंगपुरे,अतुल जयसिंगपुरे,आशिष अजमीरे, कार्तिक काळमोरे,अमित भुसारी,मनोज टाके,वैभव हांडे,आशिष गुल्हाने,ज्ञानेश्वर जयसिंगपुरे,अनिल गुल्हाने, सुनील टाके,चेतन शिंगाणे, गुणवंतराव गुल्हाने,गणेश काळमोरे,ज्ञानेश्वर आसोले,मनोज गोडबोले,शुभम लोखंडे,समर्थ खुणे,अनुप खुणे,विवेक कहारे,अनिल बिजवे,अमन लोखंडे,सागर शिंगाने,अमित शिंगाने,दिनेश गुप्ता,बाल्या शाहू,सुशील हांडे,जयेश गोडबोले यांनी निवेदन सादर केले.माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांचे नगरपरिषद क्षेत्रातील जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्ञानेश्वर आसोले, गणेश काळमोरे,संदीप शिंगाने यांचेसह उपस्थितांनी स्वागत केले.