अहमदनगर प्रतिनिधी(दि.७ मार्च):-अहमदनगर शहरातील दिल्लीगेट येथील सिध्दीबागेजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.या छाप्यात ५ जणांना पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम,जुगाराचे साहित्य दुचाकी असा ७७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सिध्दीबागेजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती.त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक/ समाधान सोळुंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोना/अहमद इनामदार,पोना/वसिम पठाण,पोना/संदीप धामणे,संदीप गिऱ्हे यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या पथकाने रविवारी (दि.५) मार्च रोजी सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला.यात ५ जण जुगार खेळताना आढळून आले.त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम,जुगाराचे साहित्य व दुचाकी मिळून आली पोलिसांनी सर्व मिळून ७७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोकॉ/सतीष भवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य सोमनाथ टाक (वय २५.रा.शितळादेवी चौक,तोफखाना), सुनील रमेश गोरे (वय ५७. रा. दत्त चौक, शिवाजीनगर,केडगाव), तुषार सदाशिव आंबेकर (वय ३३,रा.सारसनगर),मुकेश प्रताप कंडारे (वय ३४. रा.एस.टी.कॉलनी सर्जेपुरा), बबन बाबूराव कोकणे (वय ५८, रा. जाधव मळा,बालिकाश्रम रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
