प्रतिनिधी (दि.५. नोव्हेंबर):-एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल,असे बोलत विचित्र हावभाव करणाऱ्या व्यक्तीविरोधात रविवारी (दि.४ डिसेंबर) रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.हा प्रकार २९ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास संगमनेरातील एका वसतिगृहात घडला.डॉ.इथापे (संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित मुलगी अकोले तालुक्यातील रहिवासी आहे.मुलीच्या घरापासून शाळा लांब असल्याने तिला संगमनेरातील एका विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल केले.ती एका वसतिगृहात राहते.३० नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास पीडित मुलीने एका मॅडमच्या मोबाइलवरून तिच्या बहिणीला फोन केला. ती बोलता- बोलता रडत होती.बहिणीने तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की,२९ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास डॉ.इथापे सर हे बाहेर जाण्याकरिता त्यांचे गाडीने निघाले असल्याने एका मॅडमने मला वसतिगृहाचे दार उघडायला सांगितले.त्यावेळी सर फोनवर बोलत होते. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतले.त्यानंतर सर मला जे काही बोलले त्यातून माझ्या मनात लज्जा उत्पन्न झाली.पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम,२०१२, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९, तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
