अहमदनगर प्रतिनिधी(दि.८ मार्च):-नगर तालुक्यातील देहरे गावातील वार्षिक यात्रा महोत्सवात दहशत निर्माण करून दोघांवर प्राणघात हल्ला केल्याची घटना मंगळवारी दि.7 मार्च रोजी दुपारी घडली आहे.हल्ल्यात ऋषिकेश संजय लांडगे व त्यांचा मित्र विशाल ज्ञानदेव करांडे जखमी झाले आहेत.या प्रकरणी राजेंद्र शिवाजी लांडगे (रा.लांडगे वस्ती,देहरे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 193/२०२३ भादविक 307,504,34,आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आकाश शिवाजी जाधव (रा. देहरे) व त्यांचे सोबतचा एक अनोळखी पाहुणा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.देहरे येथील यात्रेमध्ये घड्याळ विक्री करण्यासाठी आलेल्या ईसमाला आकाश शिवाजी जाधव व त्यांच्यासोबतचा एक जण दम देत होते.त्यांना का दम देता, अशी विचारणा ऋषिकेश लांडगे व विशाल करांडे यांनी केली असता त्यांच्यावर कोयता व कुदळने जीवघेणा हल्ला करून जखमी केले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी/सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/हंडाळ हे करत आहेत.
