नागपूर जिल्हा प्रतिनिधी(रवींद्र खेडकर):- दि.८ मार्च रोजी आदर्श इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मीनाक्षी हर्षद वाचा सुंदर यांनी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून,सर्व महिला शिक्षकांचा सत्कार केला.या दिनाचे औचित्य साधून मुलांना आजवर ज्या स्त्रियांनी विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली व करत आहे,त्यांचे जीवन चरित्र शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले.स्त्री रिक्षाचालकापासून ते महामहिम राष्ट्रपती पदापर्यंतची स्त्रियांची वाटचाल,संघर्ष,जिद्द,भरारी शिक्षकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
