राहुरी प्रतिनिधी(दि.१० मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राहुरी तालुका अध्यक्ष स्नेहलताई सुरेंद्र सांगळे यांनी राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन दिले.या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील कनगर व राहुरी कारखाना,एमआयडीसी परिसरात येथील अवैद्य गौण खनिज उत्खन सर्रास सुरू आहे मुरूम,खडी यांची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नसतानाही गौण खनिज माफीया दिवस रात्र अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक करत आहेत. महसूलमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने गौण खनिज उत्खनन वाहतुकीस बंदी असतानाही मौजे कनगर व राहुरी कारखाना एमआयडीसी परिसरात आदेश धाब्यावर बसवून गौण खनिज उत्खनन व वाहतूक आज तागायात चालू आहेत सदर उत्खनन हे १२ तासाच्या आत बंद न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक 13 मार्च सकाळी 11 वाजे पासून उपोषणास बसणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे.यावेळी स्नेहल सुरेंद्र सांगळे,स्नेहल किरण दिवे, रेखा प्रकाश पोपळघट,छाया अशोक गुंजाळ,अर्चना धनवटे,शबाना पठाण, सखुबाई भगत,सरला भगत, आसराबाई जाधव आदीं महिला व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
