अहमदनगर प्रतिनिधी (दि.१७ मार्च):-श्रीरामपूर मधील खंडाळा गावच्या पाटाच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 3,28,080 /-रु.चा मुददेमाल जप्त करून आठ जणांवर गुन्हे दाखल केले.याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.१७ मार्च रोजी सांयकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की खंडाळा गावात पाटाच्या कडेला पत्रयाच्या शेडच्या आडोशाला काही इसम स्वताःच्या आर्थिक फायदा करीता गोलाकार बसुन पत्त्यावर पैसे लावुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत आहेत.आत्ता गेल्यास ते मुददेमालासह मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे तपास पथकास आदेश दिल्याने सदर ठिकाणी जावुन छापा टाकला व सदर ठिकाणी इसम नामे 1)जमीर समसुट्टीन शेख, वय 41 वर्षे,धंदा.मजुरी,रा.खंडाळा ता.श्रीरामपूर 2)अशोक योशेफ विघावे,वय 49 वर्षे, धंदा-मजुरी,रा.खंडाळा,ता.श्रीरामपूर 3) धंनजय अशोक जाधव,वय 38 वर्षे, धंदा-हमाली,रा.टिळकनगर, ता.श्रीरामपूर,4) सुरेश शाम त्रिभुवन,वय 59 वर्षे,रा. राजुरी ता.राहाता जि. अहमदनगर 5)विठ्ठल यादव ढोकचौळे,वय 54 वर्षे,धंदा -मजुरी,रा.खंडाळा ता. श्रीरामपूर 6) सतिश किशोर धिवर,वय 36 वर्षे, धंदा-मजुरी,रा.अचानकनगर ता. श्रीरामपूर 7)राजु सिताराम पगारे,वय 30 वर्षे, धंदा-मजुरी,रा.खंडाळा ता. श्रीरामपूर 8) कृष्णा संजय खरात,वय 25 वर्षे, धंदा- मजुरी,रा.खंडाळा ता. श्रीरामपूर हे गोलाकार बसुन तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना जुगाराची साधने व रोख रक्कम तसेच 5 मोटरसायकसह एकुण मुददेमाल रु 3,28,080 /- सह मिळुन आले.सदर इसमाना मुददेमालासह ताब्यात घेवून त्याचे विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,स्वाती भोर,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन,श्री.हर्षवर्धन गवळी यांचे कडील पथकातील सपोनि/जिवन बोरसे,पोना/साईनाथ राशिनकर,पोना/रघुवीर कारखेले,पोकॉ/राहुल नरवडे,पोकॉ/गौतम लगड,पोकॉ/ रमिझराजा अत्तार,पोकॉ/ गणेश गावडे,पोकॉ/मच्छिद्र कातखडे,पोकॉ/गौरव दुर्गुळे,पोकॉ/संभाजी खरात, पोना/फुरकान शेख,पोकॉ/ प्रमोद जाधव,पोकॉ/आकाश बहीरट नेम-अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली असुन, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ रघुवीर कारखेले हे करीत आहेत.
