शेवगाव नगरपरिषदेच्या कचरा डेपोला लागली भीषण आग
शेवगाव प्रतिनिधी(दि.१९ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव नगरपरिषदेच्या कचरा डेपोला रविवार दि.19 मार्च रोजी दुपारी 3 वाजता भयानक आग लागली सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही.तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणल्याचे माहिती समजतेय.कचरा डेपोच्या शेजारी असलेले स्थानिक रहिवासी या मुळे खूप त्रस्त असून यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.लवकरात लवकर हा कचरा डेपो इतरत्र हलवून नागरिकांचा श्वास मोकळा करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.