Maharashtra247

शहरातील पाईपलाईनरोड येथे रंगकाम करणाऱ्या  युवकाचा सातव्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२० मार्च):-इमारतीचे रंगकाम करत असलेल्या युवकाचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.ही घटना अहमदनगर शहरातील यशोदा नगर येथे काल रविवारी १९ मार्च रोजी सायंकाळी घडली.सावेडी उपनगरातील पाईपलाईनरोड येथील यशोदा नगरमध्ये मार्क कन्स्ट्रक्शनच्या इमारतीचे काम सुरू होते.तेथे गणेश संतोष भिंगारदिवे (वय ३०) याचा सातव्या मजल्यावरून रंगकाम करताना पडून मृत्यू झाला. झोक्याची दोरी तुटल्याने हा अपघात झाला असून तो इमारतीवर दोरीच्या साह्याने लटकून रंग देत होता. अचानक दोरी तुटल्याने तो खाली पडला.त्याच्या डोक्याला जबर मार लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगार व नागरिकांनी त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेले.परंतु उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

You cannot copy content of this page