हुसेनमिया हॉलिबॉल क्लब तर्फे आयोजित हॉलिबॉल स्पर्धेत सहकार क्रीडा क्लब(पंचपिर चावडी संघ) विजयी तर आदर्श क्रीडा क्लब उपविजेते
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० मार्च):-मुकुंदनगर येथे हुसेन मिया व्हॉलीबॉल क्लब आयोजित भव्य हॉलीबॉल स्पर्धेत नगरच्या सहकार क्रीडा क्लब संघ(पंचपीर चावडी संघ) विजयी तर आदर्श क्रीडा क्लब उपविजेता ठरला आहे.सामाजिक कार्यकर्ते शेरअली सय्यद फ्रेंड सर्कलच्या वतीने आयोजित केलेल्या या हॉलीबॉल स्पर्धेत अनेक संघाने भाग घेतला होता.या व्हॉलीबॉल स्पर्धेचे पहिलेच वर्ष असून तरीही अनेक संघाने भाग घेऊन याला उत्तम प्रतिसाद दिला.सहकार क्रीडा क्लबने(पंचपिर) चावडी संघ) विजेतेपद फटकावून 11,111 रुपयांचे व ट्रॉफीचे मानकरी ठरले.यावेळी सहकार क्लबचे अभिजीत खोसे व अहमदनगर पोलीस दलातील कर्मचारी परंतु सहकार क्रीडा क्लबचे राजेंद्र सुद्रिक यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.सहकार क्लब(पंचपिर चावडी संघ) कडून अरबाज बागवान,नदीम बागवान,अदिक बागवान, सुशांत डोईफोडे,सैफ शेख इत्यादी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शेर अली सय्यद यांनी विजेत्या संघास प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले तर द्वितीय बक्षीस सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांनी दिले तर तृतीय बक्षीस किंग बेकरीचे संचालक मन्सूर सय्यद यांच्या वतीने देण्यात आले.यावेळी नगरसेवक समद खान म्हणाले की क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण होतो.या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होते याचबरोबर क्रीडा स्पर्धेमुळे मनुष्याच्या आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे शरीरात अनेक व्याधी निर्माण होण्याची शक्यता होते.शेर आली फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून खेळाडूंना हॉलीबॉलच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे असे ते या वेळी म्हणाले.यावेळी शेरअली सय्यद फ्रेंड सर्कलचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.