Maharashtra247

महावितरणच्या कारभाराला ग्राहक वैतागले

नगर प्रतिनिधी (दि.२० मार्च) :-महावितरणच्या अजब कारभाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी थकबाकी वसुली मोहिम हाती घेतलेली आहे.ही थकबाकी वसूल करताना अनेक ठिकाणी नवनवीन फंडे वापरले जात आहे.यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्यावरील कामाचा ताण आता महावितरणकडून ग्राहकांवर लादला जात आहे. जुनी थकबाकीच्या वसुलीचा भार नवीन वीजजोड मागणार्या ग्राहकांवर लादला जात आहे.त्यामुळे महावितरणच्या कारभावर नाराजी व्यक्त केली जात असून या विरोधात ऊर्जा मंत्र्यांकडे तक्रारी करण्यात येत आहेत.थकबाकीमुळे नेहमीच महावितरण अडचणीत येत आहे.परंतु आता महवितरणने थकबाकी वसुली मोहिम हाती घेतलेली आहे.या मोहिमेत आता ग्राहकांना घरी जाऊन थकबाकी भरावी,याबाबत काही ठिकाणी आवाहन केले जात आहे.तर काही ठिकाणी मोबाईलवर संदेश पाठविला जात आहे.काही ठिकाणी ग्राहकाला काही न सांगता थेट वीज बिल वसुलीसाठी वीज जोड तोडला जात आहे.याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.विशेष म्हजणे एक दिवस अगोदर बिल देऊन दुसऱ्या दिवशी वीज जोड कट केला जात असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.अहमदनगर शहरात महावितणच्या अधिकाऱ्यांनी तर थकबाकी वसुलीसाठी नवीन ग्राहकांनी वीज बिलजोड घेण्यासाठी सादर केलेल्या शेजारी मीटरच्या बिलावर असलेली थकबाकी भरावी म्हणून नवीन ग्राहकांची अडवणूक करण्यास सुरवात केलेली आहे.याबाबत काहींनी महावितरणच्या अहमदनगर येथील वरिष्ठ अधिकार्याकडे तक्रारी केलेल्या आहेत.मात्र त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता नवीन ग्राहकांनी आता थेट महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्याची तयारी केलेली आहे.अहमदनगरमध्ये सुरु असलेली वसुलीची अनोख्या पध्दतीची तक्रार थेट ऊर्जा मंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.काहींनी याबाबत थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केलेली ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page