अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ मार्च):-श्रीगोंदा तालुक्यातील आरणगांव दुमाला,बेलवंडी, येथील शेत वस्तीवरील घरात प्रवेश करुन व जिवे ठार मारुन जबरी चोरी करणारी चार सराईत आरोपींची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.14 मार्च रोजी फिर्यादी श्रीमती.शर्मिला कल्याण गायकवाड,वय 34, रा.आरणगांवदुमाला, बेलवंडी,ता.श्रीगोंदा या त्यांचे कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी चार इसम येवुन घराचा दरवाजा कशाने तरी उघडुन घरात प्रवेश करुन केबल व अज्ञात हत्याराचा धाक दाखवुन घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करुन घेवुन जात असताना फिर्यादीचे पती कल्याण गायकवाड यांनी आरोपींना विरोध करताच त्यांचे डोक्यात अज्ञात हत्याराने मारहाण करुन जिवे ठार मारुन 15,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन घेवुन गेले होते. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 83/2023 भादविक 394, 302 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमुन गुन्ह्याचा समातंर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश वारुळे,पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण,बबन मखरे,दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार,बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से,रवि सोनटक्के, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते,मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व चापोना/भरत बुधवंत यांचे पथक तयार करुन कारवाई करणे कामी रवाना केले. पथकातील अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा श्रीगोंदा व बेलवंडी परिसरात फिरुन आरोपीची माहिती घेवुन समांतर तपास करीत असताना पोनि/अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्हा हा रांजणगांव मशिद, ता.पारनेर येथील आरोपी नामे निमकर काळे याने त्याचे इतर साथीदारांसह केला असुन ते जुना टोलनाका,तळेगांव दाभाडे,जिल्हा पुणे येथे पळुन गेले असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/कटके यांनी सदर प्राप्त माहिती पथकास कळवुन, उविपोअ,कर्जत विभाग यांचे कार्यालयातील सफौ/अंकुश ढवळे व बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोसई/चाटे,पोकॉ/विनोद पवार व पंचाना सोबत घेवुन तात्काळ प्राप्त माहिती प्रमाणे तळेगांव दाभाडे, पुणे येथे जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले व तात्काळ रवाना केले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तळेगांव दाभाडे येथे जावुन दोन दिवस मुक्काम तसेच वेशांतर करुन टोलनाका परिसरात आरोपीचे वास्तव्या बाबत माहिती घेता बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम व त्याचे इतर साथीदार टोलनाका परिसरात फिरतांना दिसले.पथक संशयीतांना शिताफीने ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागते पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले व तीन संशयीत इसम डोंगर व झाडाझुडपाचा फायदा घेवुन पळुन गेले त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)निमकर अर्जुन काळे,वय 21,रा.रांजणगांव मशिद,ता.पारनेर, 2)शेखर उदास भोसले, वय 20,रा. कोळगांव,ता.श्रीगोंदा,3) अतुल उदास भोसले,वय 19, रा.कोळगांव,ता.श्रीगोंदा व एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले.ताब्यातील चार संशयीताकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने चारही आरोपींना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपींना विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे गुन्हे केली आहे या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी आम्ही रायगव्हाण, ता.श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली व राळेगणथेरपाळ येथे घरात प्रवेश करुन मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल असले बाबत माहिती प्राप्त झाली आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. बेलवंडी 86/2023 भादविक 397
2. सुपा 56/2023 भादविक 397, 34
3. पारनेर 160/2023 भादविक 458, 469, 427, 380
वरील प्रमाणे माहिती प्राप्त झाल्याने चारही आरोपींना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे निमकर काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -12 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. श्रीगोंदा 98/2016 भादविक 399, 402
2. बेलवंडी 93/2017 भादविक 394,342,452,34
3. बेलवंडी 113/2017 भादविक 399,402
4. नगर तालुका 229/2018 भादविक 394,34
5. श्रीगोंदा 1831/2020 भादविक 395
6. बेलवंडी 137/2021 भादविक 394,34
7. बेलवंडी 172/2021 भादविक 379,34
8. श्रीगोंदा 243/2021 भादविक 379
9. बेलवंडी 447/2021 भादविक 379,380
10. श्रीगोंदा 875/2021 भादविक 379
11. श्रीगोंदा 878/2021 भादविक 457,380,34
12. पारनेर 838/2022 भादविक 395,397,342
आरोपी नामे अतुल भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी व गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -05 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. बेलवंडी 545/2020 भादविक 394,34
2. श्रीगोंदा 2040/2020 भादविक 394,34
3. श्रीगोंदा 243/2021 भादविक 379
4. बेलवंडी 268/2022 भादविक 379
5. बेलवंडी 23/2023 भादविक 324,323,504,506
आरोपी नामे शेखर भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारी असा गंभीर स्वरुपाचे एक गुन्हा दाखल आहे तो खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम 1. सुपा 83/2020 भादविक 399,402,आर्म ऍ़क्ट 4/25
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री.आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
