अहमदनगर प्रतिनिधी(दि.२१ मार्च):-कोयत्याने जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार असलेला सराईत आरोपीला पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.बातमीत हकीकत अशी की 24 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्यादी नामे विशाल मच्छिद्र शिरवाळे रा.काटवन खंडोबा अहमदनगर यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिलि की,दि. 23 फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचेकडील मोपेड गाडीवरुन केडगांव अयोध्यानगर येथे मित्राकडे भेटण्यासाठी जात असतांना अयोध्यानगर मराठी शाळेच्याजवळ रस्त्यावर संग्राम गिते रा.रमाजीनगर केडगांव अहमदनगर याने त्यांचे समोरुन येवुन फिर्यादीस थांबवुन तु सातपुतेच्या पोरांमध्ये का राहतो काय?तुझी लायकी आहे का,तुला मारूनच टाकतो असे म्हणून त्याचे कंबरेला लावलेल्या कोयत्याने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचे उददेशाने हातावर मारहाण करून जखमी केले आहे.वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं । ७३ /२०२३ भादवि कलम ३०७,३२४, ५०६,सह आर्म अॅक्ट ४/२५,महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी नामे संग्राम रमेश गिते रा.रभाजीनगर केडगांव अहमदनगर हा फरार झालेला होता.त्याचा शोध घेत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आरोपी नामे संग्राम रमेश गिते हा त्याचे राहते घरी येणार आहे.अशी गुप्त माहिती मिळाल्याने केडगांव येथील त्याचे राहते घराजवळ सापळा लावून आरोपी संग्राम गिते यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.त्याचे कडे गुन्हयाचे अनुषंघाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविद्र पिंगळे हे करित आहेत.आरोपी संग्राम गिते याचे विरुद्ध खालील गुन्हे दाखल आहेत.
1)कोतवाली पो.स्टे । १५६८ / २०१९ भादवि ३९२.३४
2)कोतवाली पो.स्टे । ३८५/२०२० भादवि ३५४ अ ४९९, ४५२, ३२३, ५०४, ५०६
3)तोफखाना पो स्टे ८९८/२०२१ भादवि ३५४, ३२३, ५०४, ५०६
4)कोतवाली पोस्टे ३५६ / २०२२ भादवि ३२६,३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४
5)कोतवाली पोस्टे ३७४ /२०२२ भादवि ३९४, ५०४,
6)कोतवाली पोस्टे ६८१/२०२२ भादंवि कलम ३२४, ३४१, ३२३,४२७,३४, आर्म अॅक्ट ४/२५
7)कोतवाली पोस्टे ७३/२०२३ भादवि ३०७, ३२४, ५०६, आर्म अॅक्ट ४/२५ महा पोकाक ३७(१),(३)/१३५
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, सपोनि/रविद्र पिंगळे,पोहेकॉ/सतिष भांड,पोलीस अंमलदार गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/अब्दुलकादर इनामदार,पोना/योगेश खामकर,संदिप थोरात, अमोल गाडे,सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत,सागर मिसाळ यांनी पथकाने केली आहे.
