अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ मार्च):-कोरोना काळात सर्व सामान्य माणसाबरोबर सर्वच क्षेत्रातील खासगी कंपन्यांसह आर्थिक फटका बसलेला असताना त्यात काही खासगी फायनान्स कंपन्या देखील बंद पडल्या आहेत.सर्वसामान्य माणूस हा कागदपत्रांची पूर्तता करून अत्यंत कमी वेळेत अपेक्षा पेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून त्याचे हफ्ते अपवाद वगळता नियमित न चुकता भरत असतात,परंतु कोरोनाने कंबरडे मोडले असताना त्या कंपन्यांकडून रोखीकरण (सेक्युरिटायझेशन) व वित्तीय मत्तेची पुनर्रचना आणि प्रतिभूती हितसंबंधांची अमलबजावणी अधिनियम २००२ नुसार कोणत्याही प्रकारची सुनावणीस नोटीस न देता,कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता वरील नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथून अधिकारी यांचेशी आर्थिक हितसंबंध जपत याप्रकारचे आदेश काढले जातात त्याचा त्रास कर्जदारांना होतो.थकीत किरकोळ कर्ज रक्कम खासगी सावकार पेक्षा दहापटीने जास्त आकारले जातात,नाही दिल्यास कर्जदाराला रात्री अपरात्री घरी जाऊन त्याचा अपमान करून अश्लील भाषेत बोलून त्याला हिणवले जाते,काही वेळा तर ही गैरकायद्याची मंडळी दारू पिऊन धिंगाणा घालतात.कर्जदार यांचेकडून वसुली टगे प्रत्येक भेटी दरम्यान अवाजवी पैश्याची मागणी करताना आढळून येतात.काही फायनान्स कंपन्या तर बंद पडलेल्या असताना देखील त्यांच्या कडून कर्जदार यांचा डाटा त्या कंपन्यांकडून हस्तगत करत खासगी वसुली केली जात आहे अश्या कंपन्यांना वसुलीला आळा घालण्यासाठी आपण काही तरी ठोस पर्याय शोधला पाहिजे.रोखीकरण (सेक्युरिटायझेशन) व वित्तीय मत्तेची पुनर्रचना आणि प्रतिभूती हितसंबंधांची अमलबजावणी अधिनियम २००२ यासंबंधी सध्याच्या काळात कोर्ट कचेरीचा खर्च सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही म्हणून आपणास विनंती करतो की मालमत्तेचा ताबा मिळणेकामी बंद पडलेल्या फायनान्स कंपन्याना दिलेले आदेशाची आपल्या विभागा मार्फत यांची चौकशी करून त्यांच्या मार्फत वसुली करणाऱ्या एजंटवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर च्या वतीने जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी निवेदनद्वारे नगर तहसीलदार संजय शिंदे यांना समक्ष भेटून करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा संघटक फिरोज पठाण,शहर सचिव भाऊ साळवे,शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे,शहर संघटक मनोज कर्डिले, विश्र्वभूषन गायकवाड,प्रमोद आढाव,देवा भालेराव,जे.डी.शिरसाठ,गणेश राऊत,पंकज कुलकर्णी,प्रफुल्ल घोडके आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच अक्षरशः शेकडो नव्या फायनान्स कंपन्या आसपास रियल आणि डिजिटल स्वरूपात वावरत आहेत.जाहिराती आणि नेटवर्क मधून भुरळ पाडत आहेत.झटकन पैसा मिळतो हा एक गुण त्यांच्या बाबतीत दिसतो.पण हा गुण सुंदर देखण्या कोब्रा साप सारखा आहे.नंतर तो त्याचे विषारी विखारी अवतार दाखवणारच असतो.ट्रॅप टाकायला वेगळे लोक असतात आणि तारीख चुकली की छळ करायला वेगळे असतात.फायनान्स आणि इतर सुद्धा सावकारी वसुलीला अत्यंत टुकार लोक ठेवलेले असतात.त्यांना हिंसक वर्तन खास शिकवून प्रशिक्षित केले जाते.एकाच वेळी एका हप्त्यासाठी ते संपूर्ण फॅमिलीला आणि त्यांच्या आसपासच्या सगळ्यांना छळ करतात.अर्वाच्च अश्लील गलिच्छ भाषा वापरतात.आयडिया अशी असते की माणूस वैतागून अपमानित होऊन आणखी जास्त कर्ज काढून ह्यांचे हप्ते फेडतो.पण एक दिवस चुकलेला असेल तर लागणारा दंड हा दहा टक्के पेक्षा जास्त आहे म्हणजे की घाण भाषा ऐकून त्याची भरपाई दहा टक्के जास्त नुकसान दर महा चालू असते.त्यात एक मेख घृणा यावी अशीच आहे, ती म्हणजे वसुलीला आणि छळ करायला ठेवलेली झुंड असतात.काही फायनान्स च्या वसुली प्रतिनिधींनी कांही ठिकाणी मार देखील खाल्लेला आहे,पोलीस केसेस झालेल्या आहेत त्या ठिकाणी कंपनी त्यांना आधार देत नाही.फायनान्स कडून फोनवरून ग्राहकांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या स्त्रियांबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरतात की जेणेकरून त्यांनी अवसान सोडून पुन्हा वाईट मार्गाने त्यांची भरपाई करावी.या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मोबाईल डेटा विकला जातो,फोन नंबर्स दिले जातात, कांही सॉफ्टवेअर आहेत ज्यामधून फोन नंबर मिळतात पण ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांना केवळ तुम्ही त्यांना ओळखता या बाबीने छळले जाते.याबद्दल एकच करता येईल जर कसलाच संबंध नसेल तर त्या कंपनीवर किंवा त्या व्यक्तीवर आणि त्याच्या हेड/चीफ/ब्युरो इत्यादी बाष्कळ पोस्टच्या साहेबांवर संबंधित विभागाच्या पोलिस स्टेशनला तक्रार लगेच नोंदवावी असे आव्हान वंचित बहुजन आघाडी अहमदनगरच्या वतीने करण्यात आले.
