अहमदनगर प्रतिनिधी (दि.२१ मार्च):-अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील वकीलांच्या महत्वपुर्ण असलेल्या अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी २०२३ पंचवार्षिक निवडणुकीत १२ जागेसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ॲड.संदीप पाखरे बिनविरोध निवडुन आले आहेत.ॲड.संदीप पाखरे यांचा सामाजिक कार्यामध्ये कायम सहभाग असून नगर शहरामध्ये गोरगरिबांचा वकील म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यांच्या निवडी बद्दल शहरात व तसेच नीलक्रांती चौक परिसरात नागरिकांनी फटाके उडवून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.

