श्रीगोंदा प्रतिनिधी(दि.२१ मार्च):-महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला हिरा पान मसाला, सुगंधी तंबाखू,पान मसाला,आरएमडी जर्दा,विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या इसमास बेलवंडी पोलिसांनी केले जेरबंद,ही घटना 21 मार्च रोजी घडली असून प्रशांत संजय गवळे(रा.सर्वढ तालुका जिल्हा धुळे हल्ली रा. मराठी शाळा ढवळगाव तालुका श्रीगोंदा) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.हा इसम तालुक्यातील पिंपळगाव पिसा गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गुटखा विक्रीसाठी आला असता बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली त्यानुसार बेलवंडी पोलिसांनी कार्यवाही केली असून त्याच्याकडून 59,100 रू,किमतीचा मुद्देमाल जप्त केला.पुढील तपास सफो/आर.टी/शिंदे हे करीत आहे.मपोना/सुरेखा वलवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात भादविक 328,273,188 सह अन्नसुरक्षा आणि मानके कायदा अधि 2006 चे कलम 26(2),59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई बेलवंडी पोलीस स्टेशन निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई/राजेंद्र चाटे,मपोना/सुरेखा वलवे, सफो/रावसाहेब शिंदे यांनी केली आहे.

