अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ मार्च):-दि.२२ मार्च रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,अहमदनगर शहरातील काटवन खंडोबा कमानीचे जवळ टिळकरोड लगत इसमनामे कुणालसिंग कमल सिंग जुन्नी हा अवैध हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करत आहे व आत्ता गेल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि/ चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीतील नमुद इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुणालसिंग कमल सिंग जुन्नी (वय १९ वर्ष रा.काटवनखंडोबा अहमदनगर) असे सांगुन त्याचे कब्जात दोन तलवारी, एक कोयता,एक सत्तुर अशी हत्यारे मिळुन आली. त्याचे कब्जात मिळुन आलेल्या हत्यार शस्त्र हे त्यास कोठुन तसेच कोणत्या कामासाठी आणलेले आहेत याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता सदरची हत्यारे माझीच असुन त्यापैकी एक मोठा कोयता व एक चाकु हा अर्शद रशिद शेख (वय-२२ वर्षे रा. इमामवाडा,नविन टिळकरोड अहमदनगर) याची असल्याचे कबुल केले सदर कारवाईबाबत पोना/सलीम शेख यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.२७८/२०२३ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना/महेश बोरुडे हे करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, सपोनि/रविंद्र पिंगळे,पोलीस अंमलदार सतिष भांड,दिपक बोरुडे,योगेश भिंगारदिवे, सलीम शेख,रियाज इनामदार, अभय कदम,अतुल काजळे, सुजय हिवाळे,कैलास शिरसाठ,सोमनाथ राऊत, शरद धायगुडे,कावेरी फुगारे यांच्या पथकाने केली आहे.
