अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ मार्च):-महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समिती विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतीभूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 मराठी मिशन अहमदनगरच्या अध्यक्षा डॉ.विजया ए.जाधव यांना दिल्ली येथील कार्यक्रमात देण्यात आला.डॉ.विजया जाधव यांचे शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय संशोधन व समाजकार्य याची दखल घेऊन सौ.जाधव यांना हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानाने देण्यात आला.
