शिर्डी प्रतिनिधी (दि.२३ मार्च):-मोटारसायकल चोरी करून स्वतःच्या फायदयाकरीता वापरणाऱ्यास शिर्डी पोलीसांकडून चोरीच्या मोटारसायकलसह अटक,शिर्डी पोलीस स्टेशन हददीमध्ये होणाऱ्या मोटारसायकल चोरी, सोनसाखळी चोरी व इतर गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधिक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री/नंदकुमार दुधाळ पोलीस निरीक्षक,शिर्डी पोलीस स्टेशन यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांना शिर्डी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळया वेळी नाकाबंदी व गस्त घालून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.त्यावरून दि.२० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास साईश कॉर्नर,शिर्डी येथे पोसई/माळी,पोना/ गडाख,पोकॉ/अंधारे,पोकॉ/शेलार,पोकॉ/शिंदे व होमगार्ड ठोसर असे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करत असताना १८/२० वा. च्या सुमारास इसम नामे विजय भानुदास कुऱ्हाडे,वय ३९ वर्षे,धंदा मजुरी,रा. खंडोबा चौक राहाता,जि. अहमदनगर हा त्याच्या ताब्यातील एका निळया व काळया रंगाची विना नंबरच्या हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटारसायकल वर जात असताना मिळून आला.सदर चालकास थांबवून त्याच्याकडे गाडीच्या मुळ कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवून कागदपत्र सादर करण्यास असमर्थत दर्शविली.त्यावर संशय वाढल्याने गाडीची तपासणी केली असता सदर गाडीचा चेसीस नंबर खोडलेला असल्याचे दिसले.त्यावेळी पोलीस स्टेशनला आणून त्याला विश्वासात घेवून त्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरची गाडी त्याने चोरी केली असल्याची त्याने कबुली दिली.त्यावरून पोसई/माळी यांनी लागलीच दोन पंचाना बोलावून सदरची गाडी पुढील कायदेशीर कारवाई कामी पंचनामा करून जप्त केली.पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या आदेशावरून पोकॉ/सतपाल शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून सदर इसमाविरूध्द तक्रार दिल्याने शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.१९५/२०२३ भादंवि कायदा कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.सदरची कामगीरी श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर व श्री संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग, शिर्डी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री/ नंदकुमार दुधाळ,पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन,पोसई/माळी,पोना/ गडाख,पोकॉ/अंधारे,पोकॉ/शेलार,पोकॉ/शिंदे यांनी केलेली आहे.शिर्डी पोलीस स्टेशन हददीतील व परिसरातील नागरीकांना शिर्डी पोलीस स्टेशन कडून आव्हान करण्यात येते की, कोणालाही विना नंबरची संशयीत वाहने अथवा संशयीत ज्याचा एखादया मालमत्तेच्या अथवा शरीराविरूध्दच्या गुन्हयाशी संबंध आहे असे वाटल्यास शिर्डी पोलीस स्टेशनच्या फोन नंबर ०२४२३-२५५१३३ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले आहे.
